Tue, Jul 16, 2019 21:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरे होणार लेखक

राज ठाकरे होणार लेखक

Published On: Aug 12 2018 1:09AM | Last Updated: Aug 12 2018 12:53AMमुंबई : प्रतिनिधी

राजकीय नेता, व्यंगचित्रकार, प्रभावी वक्ता अशी ओळख असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नव्या स्वरूपात दिसणार आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर  ते लवकरच पुस्तक लिहिणार असून त्याची तयारीही सध्या सुरू केली आहे. या पुस्तकातून लता दीदींचा जीवनपट उलगडला जाणार आहे.लतादीदी यांच्या दुर्मिळ छायाचित्रांसाठी त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि  भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेला भेट दिली होती.

त्यावेळी त्यांच्या या गुपिताचा उलगडा झाला आहे. या दोनही संग्रहालयात त्यांनी लता दीदी यांचे दुर्मिळ फोटो बघितले आहेत. एनएफएआयच्या अमूल्य खजिन्यात लता दीदींचे जुने तरूणपणातील दुर्मिळ फोटो, व त्यांचे सासरे मोहन वाघ यांनी काढलेले संग्रही फोटो आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर एनएफएआयकडून सदर फोटो मिळण्यासाठी केलेल्या विनंतीला मान देऊन हे फोटो ठाकरे यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती एनएफएआयच्या विश्‍वसनीय सूत्रांकडून  देण्यात आली आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी  बाळासाहेब ठाकरे यांचे चरित्र फोटोबायोग्राफीतून मांडले आहे. आता लता मंगेशकर यांच्या पुस्तकासाठी ते कोणता फॉर्म वापरणार, हे पाहणे औत्सुक्ताचे ठरणार आहे.