Thu, Nov 15, 2018 12:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरेंनी घेतले सरसंघचालकांचे ‘बौध्दिक’

राज ठाकरेंनी घेतले सरसंघचालकांचे ‘बौध्दिक’

Published On: Feb 14 2018 6:42PM | Last Updated: Feb 14 2018 7:02PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज ठाकरे यांनी सध्या फेसबुकवर राजकीय व्यंगचित्रांचा सपाटा लावला आहे. मध्यंतरी राज ठाकरे मुलाच्या साखरपुड्यात व्यस्त होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना व्यंगचित्रातून काढलेले राजकीय चिमटे पाहण्याची संधी मिळाली नाही. आता राज ठाकरे तो बॅकलॉक भरुन काढत आहेत. 

सध्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या संघाच्या ‘बौध्दिक चिंतना’मध्ये भारतीय सैन्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची चर्चा सुर आहे. त्यावरच राज ठाकरेंनी  भागवतांचे ‘बौध्दिक’ घेत. व्यंगचित्रातून चिमटा काढला. 

राज ठाकरेंनी ‘थंडीतील उबदार स्वप्न’ या मथळ्याने व्यंगचित्र काढले आहे. त्यात भागवत स्वप्न बघत आहेत. तेथे दोन संघसेवक दाखवलेत ते पाक सैनिकांना आणि दहशतवाद्यांना काठीच्या आणि संघाच्या बौध्दिक पुस्ताकांच्या जोरावर हुस्कावण्याचा प्रयत्न करत आहेत असे दाखवले आहे.     

मोहन भागवत भारतीय सैन्यावर टीका करताना म्हणाले होते की ‘सैन्याला प्रशिक्षणासाठी ६ ते ७ महिने लागतात. संघसेवकांची तयारी लवकर होते. तीन दिवसात संघसेवक सिमेवर लढण्यासाठी तयार होतील.’ त्यांचे हे वक्तव्य सैन्याचा अनादर करणारे होते. त्यामुळे राज ठाकरेंनी याच्यावर व्यंगचित्रातून चिमटा काढताना काठ्या आणि संघाची ‘बौध्दिक पुस्तके’ वाचून तुम्ही पाकिस्तानशी लढणार का? असा खोचक सवाल केला आहे.