Thu, Mar 21, 2019 15:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मी फक्त महाराष्ट्राचा, तेही तुम्ही मानत असाल तर : राज ठाकरे(Video)

मी फक्त महाराष्ट्राचा, तेही तुम्ही मानत असाल तर : राज ठाकरे(Video)

Published On: May 16 2018 3:41PM | Last Updated: May 16 2018 3:48PMअलिबाग : पुढारी ऑनलाईन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केले.  प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना राज ठाकरे यांनी भाजपने कर्नाटकाच्या निवडणुकीत केलेल्या राजकारणावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले, 'मी इतरांसारखा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे व्हिजिटींग कार्ड काढलेले नाही. मी फक्त महाराष्ट्रापुरता आहे. ते ही तुम्ही मानत असाल तर'.

राज ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रावर सर्वांचा डोळा असल्याचे पुन्हा एकदा बोलून दाखवले. महाराष्ट्र राज्य सर्वार्थाने समर्थ आहे. त्यामुळेच राज्यावर सर्वांचा डोळा आहे. मी ओरडून ओरडून सांगायचा प्रयत्न करतोय. पण माझ्या महाराष्ट्राला अजून काही गोष्टी समजत नाहीत. यामुळे आपल' आहे ते आपण गमावून बसतोय. कोकणातल्या जमिनी परप्रांतातले येऊन खरेदी करत आहेत. आमचे लोक सहज त्यांना जमिनी देतात, असेही ते म्हणाले.