Wed, Apr 24, 2019 21:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरे-आशिष शेलारांमध्ये कृष्णकुंजवर दोन तास गुप्तगू 

राज ठाकरे-आशिष शेलारांमध्ये कृष्णकुंजवर दोन तास गुप्तगू 

Published On: Apr 15 2018 1:28AM | Last Updated: Apr 15 2018 1:05AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेऊन दोन तास चर्चा केली. राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांवर राज ठाकरे आपल्या भाषणातून आणि व्यंगचित्रातून थेट हल्ला करत असताना शेलार यांनी त्यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त ताजे असतानाच शनिवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन प्रमुख नेत्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकले नाही. मनसे किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याने यासंदर्भात बोलणे टाळले. 

या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी राजकीय वर्तुळात मात्र विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. शरद पवार आणि राज यांच्यात अलीकडच्या काळात वाढलेल्या जवळकीशी या भेटीचा संदर्भ जोडला जात आहे.