Tue, Jul 16, 2019 23:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार पावसाचा अंदाज

व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार पावसाचा अंदाज

Published On: May 27 2018 1:47AM | Last Updated: May 27 2018 1:47AMमुंबई :  प्रतिनिधी

यंदाच्या पावसाळ्यात लोकल ट्रेनची वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी मध्य रेल्वेने जय्यत तयारी केली असून, पावसाचा अवघ्या तास दोन तासांचा अंदाजही मध्य रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला व्हॉट्सअ‍ॅपवर  क्षणाक्षणाला मिळणार आहे.

गेल्या पावसाळ्यात तेराहून अधिक लोकलमध्ये पाणी जाऊन त्या काही दिवस सेवेबाहेर ठेवाव्या लागल्या होत्या. यंदा मात्र हवामान खात्याच्या सहाय्याने पावसाचा नेमका अंदाज घेतला जाईल. दर तासांनी जारी होणार्‍या नाऊ कास्ट या हवामान वार्तापत्राचा आधार घेतला जाणार असल्याचे मध्य रेल्वेचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक संजयकुमार पंकज यांनी सांगितले.

यंदा मध्य रेल्वेने ट्रकमधील सखल भागांत साचणारे पाणी खेचण्यासाठी 42 आणि पालिकेने 16 पंप बसविले आहेत. त्यासह यंदा प्रथमच स्वदेशी मिल कुर्ला, शीव नाल्याजवळ 1000 अश्‍वशक्तीचे दोन महाकाय पंप बसवले जाणार आहेत. इतक्या क्षमतेचे पंप बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे. गतवर्षी 12 अश्‍वशक्ती इंजिनाचे 27 पंप बसविण्यात आले होते. यंदा 37 अश्‍वशक्तीचे पंप बसवले जाणार आहेत.