Thu, Nov 22, 2018 16:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : धुक्यामुळे लोकल उशीरा; प्रवाशांचा रेल रोको

मुंबई : धुक्यामुळे लोकल उशीरा; प्रवाशांचा रेल रोको

Published On: Dec 09 2017 8:09AM | Last Updated: Dec 09 2017 8:13AM

बुकमार्क करा

ठाणे : अमोल कदम

वाशिंद रेल्वे स्थानकात सकाळची पहिली लोकल वेळेवर आली नसल्याने प्रवाशांनी संतप्त होऊन  रेल रोको केला आहे. रेल रोकोमुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. मध्य रेल्वे मार्गावर सर्वत्र पसरलेल्या दाट धुक्याचे कारण रेल्वे प्रशासनाने सांगितले.

सकाळची ०५:०२ मिनिटांची लोकल वेळेवर आली नाही. पहाटे ४ ते ५ मेल गाड्या गेल्या नंतर कसाऱ्यावरून सकाळची ०४:२५ ची लोकल ६:०० वाजता आसनगाव स्थानकात पोहोचली. त्यामुळे वाशिंद स्थानकात प्रवाशांचा संताप अनावर झाला. प्रवाशांनी मुंबई सीएसएमटी वरून 5.50 ला सुटलेली लोकल वाशिंदला आली असता तिला अडवून रेल्वे रोको केला आहे. मोलमजुरी करणारे आणि नोकरदार चाकरमानी पुन्हा घरी परत गेले. गेल्या अनेक दिवसांपासून असेच चालू असल्याने आम्हाला घर गाठावे लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. 

पोलीस घटना स्थळी हजर झाले आहेत. प्रवाशांना रुळावरून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.