रायगड : रोह्यात चक्रीवादळाने हाहाकार

Last Updated: Jun 03 2020 7:17PM
Responsive image


रोहे (रायगड) : पुढारी ऑनलाईन

रोह्यात चक्रीवादळामुळे हाहाकार उडाला असून शहरासह ग्रामीण भागात गल्लोगल्ली झाडे पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांची, दुकानांची पत्रे, कौले उडाली आहेत. दरम्यान रोहे तालुक्यात नागरिकांचे आतोनात नुकसान झाले. दरम्यान रायगड जिल्ह्यातील रोह्यात १० वाजल्यापासून वादळी वार्‍यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सोसाटयाच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली असून झाडे पडली आहेत. यामुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.  

तालुक्यातील रोहा शहरासह नागोठणे, कोलाड, चणेरा, मेढा, घोसाळे यशवंतखार आदी भागात संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोहा कोलाड मार्गावर, भुवनेश्वर येथे घरावर झाड पडले आहे. तसेच रोहा शहरातील सरकारी गोडावूनवरील पत्रे उडाले आहेत. याचबरोबर रोहा अष्टमी नगरपरिषदेवरील शेड उडाले आहेत. याचबरोबर नुकसानीचे पंचनामे करण्यात येण्याचे सांगण्यात आले.