Tue, Mar 26, 2019 01:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राहुलना विशेष महत्त्व का?

राहुलना विशेष महत्त्व का?

Published On: Jan 18 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 9:10AM

बुकमार्क करा
भिवंडी : वार्ताहर 

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात सुरू असलेल्या दाव्याची बुधवारी भिवंडी न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणीत त्यांच्यावर दोषारोप निश्‍चित होण्याची शक्यता होती. मात्र, ते याही सुनावणीला गैरहजर राहिल्याने पुढील सुनावणी 23 एप्रिल 2018 रोजी होणार असल्याची माहिती राहुल यांचे वकील अ‍ॅड. नारायण अय्यर यांनी दिली. दरम्यान, प्रत्येक सुनावणीच्या वेळी राहुल गांधी यांना विशेष महत्त्व का? याकडे याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रबोध जयवंत यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. 

महात्मा  गांधींजींची हत्या आरएसएसनेच घडवून आणली, असे खळबळजनक वक्तव्य राहुल गांधी यांनी 6 मार्च 2014 रोजी पंधराव्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भिवंडीत केले होते. या वक्तव्याने आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत आरएसएसचे शहर जिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.