Mon, Nov 19, 2018 21:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केरळ पूरग्रस्तांसाठी दिली २५ हजार मदत 

राही सरनोबतने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

Published On: Sep 11 2018 1:38AM | Last Updated: Sep 11 2018 1:23AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

एशियन गेम्स 2018 स्पर्धेत देशाला नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवून देणार्‍या राही सरनोबत हिने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी तिचे अभिनंदन करतानाच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तिने केरळ पूरग्रस्तांसाठी 25 हजार रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला. 

राही सरनोबत हिने नुकत्याच झालेल्या एशियन गेम्समध्ये नेमबाजीतील 25 मीटर एअर पिस्तुल या प्रकारात सुवर्णवेध घेतला होता. ती रविवारी रात्री मुंबईत परतली. तिने सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी क्रीडामंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा आणि राही सरनोबत यांचे नातेवाईक उपस्थित होते.

2020 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेतही राही सरनोबत हिने भारतासाठी खेळताना अशीच सुवर्णवेधी कामगिरी करावी, अशा अपेक्षाही यावेळी व्यक्‍त करण्यात आल्या. त्यानंतर राहीने महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली.