Fri, Jul 19, 2019 01:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राधेश्याम मोपलवार यांना मुदतवाढ

राधेश्याम मोपलवार यांना मुदतवाढ

Published On: Mar 01 2018 1:56AM | Last Updated: Mar 01 2018 1:54AMमुंबई : खास प्रतिनिधी

अनेक आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार हे बुधवारी सेवानिवृत्त झाले, मात्र मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाचे ते प्रमुख असल्याने त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देऊन त्याच पदावर नियुक्ती केली आहे. 

आता मोपलवार आहे त्याच पदावर करार पध्दतीने काम करतील. समृद्धी महामार्गाची आखणी झाल्यानंतर या महामार्गालगतच्या मोक्याच्या जागा सनदी अधिकार्‍यांच्या नातेवाईकांनी आधीच विकत घेतल्याचे आरोप झाले होते. त्यात मोपलवार यांचेही नाव होते. त्यानंतर एक शासकीय भूखंड स्वस्तात देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करणारी एक सीडीच विधीमंडळाच्या गेल्या पावसाळी अधिवेशनात मिडीयाकडे आली होती.  

या दोन्ही प्रकरणांवरून गदारोळ झाल्यानंतर मोपलवार यांना दीर्घ रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र चौकशीनंतर त्यांना क्‍लिनचीट मिळाली. त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले होते. आता मोपलवार यांना निवृत्तीनंतर पुन्हा तीच जबाबदारी देण्यात आली आहे.