Mon, Sep 24, 2018 21:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘मराठी भाषा भवन तरी गुजरातमध्ये बांधू नका’

‘मराठी भाषा भवन तरी गुजरातमध्ये बांधू नका’

Published On: Jan 10 2018 9:59AM | Last Updated: Jan 10 2018 9:59AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारने मराठी भाषा भवन उभारण्याची घोषणा केली. परंतु, अद्याप मराठी भाषा भवनाचे साधे स्थळदेखील निश्चित झालेले नाही. आधी रंगभवन धोबी तलाव, नंतर नवी मुंबई अशा अनेक जागा चर्चेत आहेत. आता किमान मराठी भाषा भवन तरी गुजरातमध्ये बांधू नका, म्हणजे मिळवले, असा उपरोधीक टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्य सरकारला लगावला.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभाग यांच्या वतीने विधानभवनात मायबोली मराठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होताना विखे-पाटील सरकारच्या मराठी भाषेबाबतच्या अनास्थेकडे लक्ष वेधले. मराठी भाषा भवन उभारण्यची घोषणा झाली. परंतू अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मिलवरील डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाप्रमाणेच हे भवन देखील रखडले आहे. त्याच्या कामाला गती देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील फाइल गेली तीन वर्षे केंद्राकडे प्रलंबित आहे. मराठी भाषेला केवळ अभिजात भाषेचा दर्जा देऊन चालणार नाही, तर मराठी भाषा विभागासाठी आर्थिक तरतूद वाढवली पाहिजे. मराठी विभाग, मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट यांसारख्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणार्‍या सर्वच घटकांना मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.