Sun, Jul 21, 2019 02:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरटीआय अहवाल; हार्बर लाईनवर आत्तापर्यंत १४३ बळी

आरटीआय अहवाल; हार्बर लाईनवर आत्तापर्यंत १४३ बळी

Published On: Sep 12 2018 2:08PM | Last Updated: Sep 12 2018 2:08PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईची उपनगरी लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाइफ लाइन आहे. दररोज 80 लाखापेक्षा जास्त  प्रवासी उपनगरीय रेल्वे गाड्यातून प्रवास करतात. मुंबईच्या रेल्वेगाड्यांमध्ये बरेच गर्दी असते,  ज्यामुळे प्रवाशांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दारावर लटकून आणि उभे राहून प्रवास करतात. तसेच काही प्रवासी ट्रेनच्या छतावर प्रवास करतात आणि काही तरुण मुले करतबबाजी करतात. यामुळे दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी रेल्वे गाड्यातून पडून किंवा शॉक लागून  मरतात. तसेच गेल्या पाच वर्षांत शॉक लागून 143 प्रवाश्यांना आपले जीव गमावल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस रेल्वे पोलीस विभागांनी दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी रेल्वे पोलीस आयुक्त यांचे कार्यालयात रेल्वेच्या ओवरहेड वायर पासून शॉक लागून किती प्रवाशांचा मृत्यू किंवा जखमी झाले आहे. याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात जनमाहिती अधिकारी वसंतराव शेटे यांनी माहिती शकील अहमद शेख यांस माहिती अधिकार अधिनियम-2005 अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे सन 2013 पासून मे 2018 पर्यंत ओवरहेड वायर पासून शॉक लागून एकूण 143 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 138 प्रवासी  जखमी झाले आहे. मध्य रेल्वेच्या सीएसटी ते कर्जत स्थाकांन दरम्यान एकूण 67 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 52 प्रवासी  जखमी झाले आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते पालघर स्थाकांन दरम्यान  एकूण 40 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 31 प्रवासी  जखमी झाले आहे.

 तसेच हार्बर रेल्वेच्या संडहर्स्ट रोड ते पनवेल  स्थाकांन दरम्यान एकूण 36 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 39 प्रवासी  जखमी झाले आहे. सर्वात जास्त ओव्हर रेल्वेहेड वायरचा शॉक लागून प्रवाशांचा मृत्यू चेंबूर आणि टिळक नगर स्थाकांन दरम्यान झाला आहे. चेंबूर स्थानकावर एकूण 11  प्रवाशांचा मृत्यू व 6 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच टिळक नगर स्थानकावर एकूण 5  प्रवाशांचा मृत्यू व 14 प्रवासी जखमी झाले आहे.

तसेच मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये 2017 साली रेल्वेनगाड्यातून पडून  / कट झाल्याने 3014 प्रवासी मृत्यू पावले. आणि रेल्वेनगाड्यातून पडून  3345 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच मध्य रेल्वेगाड्यातून पडून  / कट झाल्याने 1534 प्रवासी मृत्यू पावले आणि रेल्वेनगाड्यातून पडून  1435 प्रवासी जखमी झाले आहे. आणि पश्चिम  रेल्वेगाड्यातून पडून  / कट झाल्याने 1086 प्रवासी मृत्यू पावले आणि रेल्वेनगाड्यातून पडून  1540  प्रवासी जखमी झाले आहे. तसेच हार्बर उपनगरीय  रेल्वेगाड्यातून पडून  / कट झाल्याने 394 प्रवासी मृत्यू पावले आणि रेल्वेनगाड्यातून पडून  370 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रेल्वेगाड्यातून पडून जखमीं किंवा मृत प्रवाश्यांना उचलण्यासाठी  कोणतेही विशेष कर्मचारी नियुक्त केले गेले नाहीत. अशा अपघातानंतर संबंधित स्टेशन मास्टर स्थानिक हमाल व स्वयंसेवी सेवकांची मदत घेतात.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते  हार्बर लाईनवर ओव्हर रेल्वेहेड वायरचा शॉक लागून सर्वात जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याचे मुख्य कारण आहे कि, हार्बर लाईनवर ट्रेनच्या फेऱ्या कमी आहेत. तसेच दुसरे कारण आहे कि,  गोवंडी आणि चेंबूर क्षेत्रात राहणारी तरुण मुले ट्रेनच्या छतावर करतबबाजी करताना आपले जीव गमावतात. 

गोवंडी आणि चेंबूर क्षेत्रात राहणाऱ्या रहिवासी यांनी आप-आपल्या  मुलांना ताकीद देण्याची गरज आहे कि, ट्रेनच्या छतावर प्रवास करू नये आणि करतबबाजीसुद्धा करू नये. तसेच  शकील अहमद शेख यांनी मुंबईकरांना अपील केले आहे कि, आपण सुरक्षित प्रवास करावा, आपल्या मागे आपले कुटुंब आहे. त्यांची काळजी करावी. यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वे बोर्ड चेयरमैन अश्वनी लोहानी यांस पत्र पाठवून हार्बर लाईनवर गाड्याच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली आहे