Thu, Jun 20, 2019 00:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरटीईचे प्रवेश नाकारले; ११ शाळांना नोटिसा

आरटीईचे प्रवेश नाकारले; ११ शाळांना नोटिसा

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 12 2018 1:11AMमुंबई : प्रतिनिधी

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत 25 टक्के राखीव जागांसाठी दिल्या जाणारे प्रवेश नाकारलेल्या दक्षिण मुंबईतील तब्बल 11 शाळांना शिक्षण विभागाने नोटिसा दिल्या आहेत. सरकारकडून पैसे न दिल्याचे कारण सांगून प्रवेशाला नकार देणार्‍यांना मान्यता रद्द करण्याची तंबीही देण्यात आली आहे.

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी निश्‍चित केलेल्या बालकांच्या पालकांना प्रवेश घेण्यासाठी शिक्षण विभागाने मुदत वाढवूनही या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून मिळणारा परतावा शुल्क मिळत नसल्याचे कारण पुढे करत यंदाचे प्रवेश न देण्याचा निर्णय या शाळांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांना त्या शाळेचा प्रवेश निश्‍चित होवूनही प्रवेश न देणार्‍या  11 शाळांना दक्षिण विभागाचे शिक्षण निरीक्षण कार्यालयाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. 13 एप्रिल प्रवेशाची अंतिम मुदत आहे. या काळात जर विद्यार्थ्यांना या शाळांनी प्रवेश दिले नाहीत तर या शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल, असे शिक्षण निरीक्षक कार्यालयातून स्पष्ट केले आहे. 2014-15 पासूनचे विद्यार्थ्यांचे परतावा शुल्क उपसंचालक कार्यालयाला प्राप्त झाले असून ते शाळांच्या स्वतंत्र बँक खात्यावर जमा केले जाणार आहे असही त्या नोटिसमध्ये म्हटले आहे.  

Tags : mumbai, mumbai news, RTE access, denied, 11 Schools, Notice,