न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, हा जय-पराजय नव्हे, संयमाने आनंद व्यक्त करा : मोहन भागवत 

Last Updated: Nov 09 2019 1:15PM
Responsive image
मोहन भागवत


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशाच्या धार्मिक आणि राजकीय तसेच सांस्कृतिक पटलावर अत्यंत संवदेनशील ठरलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी वादग्रस्त जमिनीवर अखेर निवाडा झाला आहे. सर्वोच्च  न्यायालयाने आज (ता.०९) सव्वाशे वर्षापासून प्रलंबित असलेल्या  अयोध्येतील वादग्रस्त जागेवर रामलल्लाचा हक्क असल्याचे स्पष्ट केले.  

राम मंदिरासाठी प्रदीर्घ कालावधीपासून संघर्ष करत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले.  

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाने ५-० अशा एकमताने अयोध्येतील वादग्रस्त जागा ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. राम मंदिराच्या निर्माणासाठी तीन महिन्यात कार्यवाही करण्याचे आदेशही घटनापीठाने दिले. 

निकालाचे वाचन करताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतील महत्त्वाच्या अशा ठिकाणी पर्यायी ५ एकर जागा देण्याचा आदेश दिला. 

मोहन भागवत म्हणाले.... 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत 

न्याय देताना सर्व पैलूंचा बारीक विचार करण्यात आला  

सर्वांच्या सहकार्याचे आणि बलीदान दिलेल्यांचे स्वागत करतो

हा निर्णय जय किंवा पराजयाचा नाही

कोर्टाच्या निर्णयाने न्याय मिळाला 

संयम ठेवून आनंद व्यक्त करा 

भव्य राममंदिर उभारणीसाठी सहकार्य करू