Mon, Mar 25, 2019 13:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरपीएफच्या रेखा मिश्रा दहावीच्या धड्यात

आरपीएफच्या रेखा मिश्रा दहावीच्या धड्यात

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:10AMमुंबई : प्रतिनिधी

कर्तव्य बजावत असताना रेल्वेस्थानकांवर चुकलेल्या मुलांना आई-वडीलांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार्‍या आरपीएफ उपनिरीक्षक रेखा मिश्रा यांचा महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या मराठीच्या पाठ्य पुस्तकात धडा सामील केला आहे. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवत आज पर्यंत 953 मुलांना सुखरुप घरी पोहोचवल्याबद्दल केलेल्या कामाची पोहेचपावती यारुपाने रेखा मिश्रा यांना मिळाली आहे.यामुळे मुंबई रेल्वे व त्यांचे अधिकारी यांच्यापुढे एक आदर्श निर्माण झाला आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) महिला उप-निरीक्षक रेखा मिश्रा 2014 मध्ये आरपीएफमध्ये सामील झाल्या. 2016 मध्ये त्यांनी सीएसएमटी स्टेशनवर 434 मुलांचे, 45 मुलींना सुटका केली.आज अखेर आरपीएफचे पोलीस अधिकारी रेखा मिश्रा यांनी 953 मुलांचे बचाव करण्यासाठी मदत केली.बचावकार्य करताना बरेचदा आव्हानात्मक प्रसंगांना तोंड द्यावे लागते.मुळची अलाहाबाद येथील राहणारी रेखा यांचे इंग्रजी विषयातून एम.ए.बी.एड शिक्षण झाले आहे.वडील भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त असून तिन्ही भाऊदेखील सध्या भारतीय सैन्यात कार्यरत आहेत.त्यामुळे जन्मापासूनच रेखा यांना देशसेवेचा वारसा भेटला आहे.

महिला सक्षमीकरणाच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल अनेक मान्यताप्राप्त संस्था व शासनाने प्रशंसा केली व पुरस्कार दिले आहेत.जागतिक महिलादिनी 8 मार्च 2018 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात एका समारंभात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते एक लाख रुपये रोख मानधन आणि प्रमाणपत्र देण्यात आले. फिक्की फेडरेशनमार्फत दिल्ली येथे 30 मे 2018 रोजी  पुरस्कार यासह अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळविण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे.