Mon, Apr 22, 2019 23:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अशी आहे दहा रुपयांची नवीन नोट

अशी आहे दहा रुपयांची नवीन नोट

Published On: Jan 05 2018 5:39PM | Last Updated: Jan 05 2018 5:46PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

रिझर्व्ह बँकेकडून दहा रुपयांची नवी नोट व्‍यवहारात आणण्यात आली आहे. बँकेने आज नव्या दहा रुपयांच्या नोटेचा फोटो आणि त्याची माहिती वेबसाईटवरुन प्रसिद्ध केली. जुन्या नोटेइतकीच नव्या नोटेची उंची असून लांबी मात्र कमी करण्यात आली आहे. नवी नोट चॉकलेट ब्राऊन रंगात असणार आहेत. या नोटेवर कोनार्क येथील सूर्य मंदिरही असल्याने नोटेवरचा हा मोठा बदल असल्याचे सांगण्यात येत आहे. दहा रुपयांची नवी नोट चलनात आली तरी जुनी नोट चलनात कायम राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.

दहा रुपयांच्या नोटेवर करण्यात आलेल्या बदलला सरकारकडून मान्यता मिळाली आहे. दहाच्या नोटेवर २००५ मध्ये शेवटचा बदल करण्यात आला होता. त्यानंतर दीर्घ कालावधीनंतर दहा रुपयांच्या नोटेवर बदल करण्यात आला आहे.  

मागील वर्षी नोटाबंदीनंतर आरबीआयकडून २ हजार, २०० आणि ५० रुपयांच्या नोटा व्‍यवहारामध्ये आणण्यात आल्या आहेत. आर्थिक व्‍यवहारात बनावट प्रकारच्या येणार्‍या चलनामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे होत असतात. भारतीय अर्थव्‍यवस्‍थेला बळकटी देण्यासाठी असे निर्णय घेतले जात असतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.