Thu, May 23, 2019 20:26
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीएनबी घोटाळ्याप्रकरणी आरबीआयकडेही बोट!

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी आरबीआयकडेही बोट!

Published On: Feb 20 2018 1:42AM | Last Updated: Feb 19 2018 9:59PMमुंबई : वृत्तसंस्था

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी बँक असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी आरबीआयच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

हिरे व्यापारी नीरव मोदी याने त्याच्या व्यावसायिक भागीदारांच्या मदतीने पीएनबीला सुमारे 11 हजार 500 कोटींचा चुना लावल्याचे उघड झाले आहे. पीएनबीच्या कनिष्ठ अधिकार्‍यांसोबत संगनमत करून लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) पदरात पाडून हा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे माजी अध्यक्ष विश्‍वास उटगी यांनी आरबीआयच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे. एलओयूबाबत तीन महिन्याला खातरजमा करण्याचे काम आरबीआयचे आहे. आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर यू. व्ही. रेड्डी, डी. सुब्बाराव, रघुराम राजन आणि विद्यमान गव्हर्नर ऊर्जित पटेल एवढा मोठा घोटाळा घडेपर्यंत काय करीत होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या घोटाळ्याला आरबीआयलाही का जबाबदार धरू नये, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 2011 साली नीरव यास एलओयू देण्यात आला. तेव्हापासून आरबीआयने पीएनबीकडे याबाबत खुलासा का मागितला नाही, अशी विचारणाही त्यांनी केली.