Tue, Jul 23, 2019 06:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘क्यूएस’ रँकिंगः आयआयटी मुंबई अव्वल

‘क्यूएस’ रँकिंगः आयआयटी मुंबई अव्वल

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 1:11AMमुंबई : प्रतिनिधी 

नव्या संकल्पना, नावीन्यपूर्ण संशोधन आणि अभ्यासक्रमासाठी ओळखल्या जाणार्‍या आयआयटी मुंबईने  क्यूएस रँकिंगच्या जागतिक क्रमवारीत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्यावर्षीच्या स्थानावरुन यंदाच्या क्रमवारीत सुधारणा करीत आयआयटी मुंबईने जगभरातील पहिल्या 200 विद्यापीठांच्या यादीत आपले स्थान बळकट केले आहे. गेल्या वर्षी 179 व्या क्रमांकावर असलेल्या आयआयटी मुंबईने यंदा 162 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्‍ली, चेन्‍नई आयआयटी मात्र जैथे ठिकाणावर आहे. मुंबई विद्यापीठालाही  पहिल्या 500 मध्येही स्थान नाही.

क्वाक्वारेली सायमंडस् (क्यूएस) ही ब्रिटिश कंपनी दरवर्षी जगातील तसेच विविध खंडांतील विद्यापीठांचे रँकिंग दरवर्षी जाहीर करते. जगभरातील विद्यापीठांमध्ये होत असलेले संशोधन, तेथील सोयीसुविधा, लोकप्रियता आदींना प्राधान्य देत ही क्रमवारी जाहीर केली जाते. भारतातील रँकिंगमध्ये 100 पैकी 48.2 गुण मिळवीत आयआयटी बॉम्बेने प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. यामध्ये एकॅडेमिक रेप्युटेशनमध्ये 52. 5 , एम्प्लॉयर रेप्युटेशनमध्ये 72. 9, फॅकल्टीसाठी 54. 1, फॅकल्टी पर स्टुडंट 43. 3, इंटरनॅशनल फॅकल्टीसाठी 4. 4 तर इंटरनॅशनल स्टुडंटसाठी 1. 8 असे गुण आयआयटी मुंबईला मिळाले आहेत.

मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ 800 ते 1000च्या क्रमवारीत असून गेल्यावर्षीच्या तुलनेत पुणे विद्यापीठाचे क्रमवारी मात्र घसरली आहे.बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयएसस्सी)या संस्थेने 190 व्या स्थानावर समाधनावर मानावे लागले आहे.