होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ॠतुजाला लोकलमधून ढकलणारा शहाडमधून अटकेत

ॠतुजाला लोकलमधून ढकलणारा शहाडमधून अटकेत

Published On: Dec 13 2017 2:30AM | Last Updated: Dec 13 2017 2:18AM

बुकमार्क करा

नवी मुंबई : प्रतिनिधी

जुईनगर रेल्वे स्थानकात धावत्या लोकलच्या महिला डब्यातुन पर्स आणि कानातील रिंग खेचून  ॠतुजा बोडके या विद्यार्थिनीला लोकलमधून फेकणार्‍या आरोपीला अखेर मंगळवारी रेल्वे पोलीसांनी अटक केली. संतोष केकान असे पकडण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.

ही घटना 3 डिसेंबर रविवारी जुईनगर रेल्वेस्थानकात घडली होती घटना. या घटनेची उकल करण्यासाठी रेल्वे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, उपायुक्त समाधान पाटील यांनी स्वता: लक्ष घातले होते. 
तो शहाड ठाणे येथील राहणारा आहे. घटनेच्या दिवशी त्याने मद्यपान केले होते. मानसरोवर स्थानकातून रेल्वेने जात असताना त्याने महिला डब्यात ऋतुजा एकटी बघून तिला लुटन्याच प्रयत्न केला.

परंतु तिने विरोध केल्याने तिला रेल्वेतुन खाली ढकलून पळ काढला. तपास दरम्यान वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश पाटील यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असता या तरुणाला सोडण्यासाठी एक सफेद रंगाची इनोव्हो मधून तो उतरला असल्याचे आढळून आले. या वाहनांची माहिती नवी मुंबई नियंत्रण कक्षेच्या सीसीटिव्ही फुटेजमधून मिळवली असता ती विपूल पाटील याची असल्याचे समोर आले. विपुल पाटील यांची आरटीओमधून माहिती घेवून त्याला चौकशीसाठी बोलवल्यानंतर त्याने तो संतोष भिकाजी केकाण असून तो मित्र असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला शहाड येथील म्हारळगाव येथे अटक करण्यासाटी गेले असता त्याने पोलीसांच्या हातावर तुरी देत पळ काढून पसार झाला. त्यानंतर वाशी रेल्वे पोलीसांना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार तो शीळफाटा येथील हॉटेल पुजा पंजाब येथे आल्याचे कळाले. येथेच सापळा रचून कल्याण रेल्वे पोलीसांच्या मदतीने अटक केली.