Wed, Nov 14, 2018 14:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पैसे नसलेल्या खात्याचा धनादेश देत १६ लाखांची दागिनेखरेदी

पैसे नसलेल्या खात्याचा धनादेश देत १६ लाखांची दागिनेखरेदी

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 1:09AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

झवेरी बाजारातील व्यावसायिकाकडून सुमारे 16 लाखांंच्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करत पैसे नसलेल्या खात्याचा धनादेश देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित व्यावसायिकाच्या तक्रारीवरून लो. टिळक मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बँक खात्याचा तपशील व मोबाईलआधारे ठगाचा शोध सुरू केला आहे.

भायखळ्याच्या घोडपदेव परिसरातील मोहन खेडा हाईटस इमारतीत राहणारे श्रीपाल जैन यांचा झवेरी बाजारातील सिल्वर पॅलेस मार्केटमध्ये सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. एका ठगाने गेल्या महिन्यांपासून त्यांच्याशी ओळख वाढवली. यातूनच गेल्या 30 नोव्हेंबरला 15 लाख 98 हजाराचे 540 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी केले. मात्र ठगाने हा व्यवहार रोखीने न करता याचा चेक दिला. जैन यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेऊन घेतलेला तो चेक खात्यात पैसे नसल्याने वठलाच नाही. अखेर जैन यांनी ठगाने सांगितलेल्या दुकानाच्या पत्त्यावर जाऊन शोध घेतला असता दुकान बंद करुन तो पळून गेल्याचे उघड झाले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जैन यांनी सोमवारी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.