Wed, Mar 27, 2019 06:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पैसे परत करण्यासाठी मालमत्ता विका अथवा भिक मागा!

पैसे परत करण्यासाठी मालमत्ता विका अथवा भिक मागा!

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 06 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी

ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी 50 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यास असमर्थ ठरलेल्या पुण्याचे बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना उच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा चांगलेच फैलावर घेतले. आम्हाला तुमची नाही तर सर्व सामान्य गुतंवणूकदारांची काळजी आहे. त्यांचे पैसे परत करण्यासाठी मालमत्ता विका अथवा भिक मागा , लोकांचे पैसे कधी परत करणार लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहीती द्या, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी डीएसके यांना फटकारले. 

पुढील सुनावणीच्यावेळी न्यायालयात कोणताही बहाणा करू नका. तोपर्यंत आधी 7 ते 11 फेबु्रवारी या पाच दिवसात सकाळी 11ते 1 आणि 3 ते 5 या वेळत तपास अधिकार्‍या समोर हजर रहा, असे निर्देश देतानाच न्यायमूर्ती साधना जाधव यांनी डी.एस.कुलकर्णी यांना 13 फेबु्रवारी पर्यत आणखी दिलासा दिला.

उच्च न्यायालयालयानंतर सर्वोच्च न्यायालयाने 50 कोटी रुपये जमा करण्यास मुदत वाढ देऊनही ते जमा न करता आल्याने डी.एस. कुलकर्णी दापत्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी दाखल केलेल्या अर्जावर न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी डी.एस. कुलकर्णी यांच्यावतीने अ‍ॅड. अशोक मुदरगी यांनी पुन्हा एकदा पैसे जमा करण्यास अपयशी आल्याचे गार्‍हाणे न्यायालयात मांडले.

आंतरराष्ट्रीय बँकेने मागितलेल्या डॉक्युमेंटसची पूर्तता झालेली नसल्याचे न्यायालयात सांगताना लिलावासाठी योग्य अशा 4 मालमत्तेची यादी त्यांनी सादर केली. या संपत्त्तीची सरकारी किंमतीनुसार 328 कोटी रूपये मुल्य असलेतरी बाजारभावाने त्याचे मुल्य कितीतरी अधिक पटीने असल्याचा दावा केला. तसेच ही मालमत्ता विकण्यास अडथळे येत असल्याने न्यायालयाने अधिकारी नेमून मालमत्तेचा लिलाव करावा, अशीही भूमिका डीएसकेंच्या वतीने मांडण्यात आली. याला सरकारी वकील अ‍ॅड. चव्हाण आणि ठेवदारांनी जोरदार आक्षेप घेतला. न्यायालयाने राज्य सरकारलाही चांगलेच धारेवर धरले. केवळ कागदी घोडे नाचवायचे आता थांबवा. डीएसके फसवणुक करताहेत, न्यायालयालयाची दिशाभूल करत असले तरी तुम्ही आता पर्यत गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी काय केले, असा सवाल न्यायालयानेव्यक्त केले.