Tue, Nov 13, 2018 10:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिंसाचाराला आंबेडकरांसह पक्ष जबाबदार धरा

हिंसाचाराला आंबेडकरांसह पक्ष जबाबदार धरा

Published On: Mar 07 2018 2:09AM | Last Updated: Mar 07 2018 1:22AMमुंबई : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा दंगलीनंतर  राज्यात उसळलेल्या हिंसाचाराला चिथावणी देणार्‍या  डॉ. प्रकाश आंबेडकरांसह त्याचा पक्षावर कारवाई करा. तसेच या हिंसाचारात सार्वजनिक मालत्तेच्या नुकसानीला जबाबदार ठरवून 50 कोटी वसूल करा, अशी मागणी करणार्‍या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने आज दखल घेतली. न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम.एस कर्णिक यांच्या खंडपीठाने राज्यात  घडलेल्या हिंसाचाराच्या घटना आणि त्या विरोधात कोणती पावले उचलली, या संदर्भात चार आठवड्यात  प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश  राज्य सरकारला दिले.

जानेवारीत कोरेगाव भीमा इथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या लोकांवर सणसवाडी इथे दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर  माजी पोलीस आयुक्त ज्युलीओ रिबेरो यांच्या अ‍ॅक्शन फॉर गुड गर्व्हर्नन्स या सामाजिक संस्थेच्यावतीने  जयकर अ‍ॅड जयकर या लॉ फर्मने  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तीवाद करताना कोरेगाव भीमा दंगलीनंतर राज्यात उसळलेल्या हिंसाचाराला डॉ. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाला जबाबदार धरून त्यांच्या विरोधात कारवाई करा. तसेच या हिसाचारात सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे 50 कोटी रूपयाचे नुकसान वसूल करा, अशी विनंती  न्यायालयाला केली. याची दखल न्यायालयाने घेतली. 

राज्यात घडलेल्या हिसांचाराच्या घटनाच्या संदर्भात कोणती पावले उचलली, केलेल्या कारवाई संदर्भात चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश राज्य सरकारला दिले.