Mon, Nov 19, 2018 15:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : रिफायनरी विरोधात धरणे आंदोलन (व्हिडिओ)

मुंबई : रिफायनरी विरोधात धरणे आंदोलन (व्हिडिओ)

Published On: Dec 08 2017 1:56PM | Last Updated: Dec 08 2017 1:56PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

'आझाद मैदान' येथे रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेने धरणे आंदोलन करण्यात आले. राजापूरच्या तेल शुध्दीकरण कारखान्याला ( रिफायनरी ) कोकणातील जनतेचा विरोध आहे. या प्रकल्पग्रस्त गावांसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मुंबईतील कोकणवासीयांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. 

पृथ्वीच्या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर, मानवजात व जीवसृष्टी वाचवण्याच्या दृष्टीने,  पॅरिस कराराचे पालन करण्यासाठी हा लढा ऊभा केला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रासह देशातील मान्यवर तसेच संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यात पी. बी. सावंत,  र. ग. कर्णिक, बंडातात्या कराडकर, बी. जी. कोळसेपाटील, प्रवीणाबेन देसाई,  प्रा. एच. एम. देसरडा, काळूरामकाका दोधडे, प्रा. डॉ. शशीकुमार मेनन, सुश्री  मधुकांता दोशी आदींचा समावेश आहे.