Mon, Mar 25, 2019 13:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अन न्यायाधिशांनीच मोबाईल काढून घेतला...

अन न्यायाधिशांनीच मोबाईल काढून घेतला...

Published On: Apr 26 2018 2:00AM | Last Updated: Apr 26 2018 1:28AMमुंबई : अवधूत खराडे

मालमत्तेच्या वादातून विवाहितेने कौटुंबिक छळाच्या दाखल केलेल्या तक्रारीवरुन सुरु असलेल्या खटल्यात अंतिम आदेश दिल्यानंतर हे आदेश मान्य असल्याचे लिहून देण्यासाठी दंडाधिकारी न्यायाधिश महाराजांनी महिलेच्या पतीवर वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र हा पती आदेश मान्य असल्याचे लिहून देण्यास तयार होत नसल्याचे लक्षात येताच संतापलेल्या न्यायाधीश महाराजांनी न्यायालयातील पोलिसांना सांगून त्याचा मोबाईल काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार विकोळी दंडाधिकारी न्यायालयात समोर आला आहे. न्यायाधिशांच्या या पराक्रमानंतर पिडीत पतीने वकिलांच्या मदतीने याविरोधात उच्च न्यायालयाच्या विशेष दक्षता तपास विभागाकडे धाव घेतली आहे. 

चेंबूरच्या उच्चभ्रु परिसरात हा पिडीत पती पत्नी, मुलगा आणि 83 वर्षीय वयोवृद्ध वडिलांसोबत राहातो. आर्थिक स्थिती खालवत असल्याने हे संपूर्ण कुटूंब राहात असलेला दोन बेडरुम किचन फ्लॅट वयोवृद्ध वडिलांनी विकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी मुलला आणि सुनेला घर खाली करण्यासाठी नोटीसा धाडल्या. नोटीस हातात पडताच सुनेने याविरोधात कौटुंबिक छळाची तक्रार करुन विक्रोळी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात सुरू झालेल्या खटल्यामध्ये पिडीत पतीच्या बाजूने अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर यांनी युक्तीवाद केला. फ्लॅट वडिलोपार्जीत नसून सासर्‍यांनी स्वत:च्या हिंमतीवर खरेदी केला आहे. त्यावेळी तूमचा पती अवघ्या सात वर्षांचा होता. त्यामुळे हा फ्लॅट विकण्याचे सासर्‍यांना पूर्ण अधिकार आहेत. ते मुलगा आणि सुनेला घराबाहेर काढू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.फ्लॅट हातातून गेल्याने या विवाहितेने राहाण्यासाठी घराची व्यवस्था आणि पोटगीची मागणी केली. तसेच पती बेरोजगार आहे. 

Tags : Mumbai, Mumbai news, Property, disputes ,