Sat, Mar 23, 2019 16:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मालाड शिवसैनिकाच्या हत्येमागे मालमत्तेचा वाद?

मालाड शिवसैनिकाच्या हत्येमागे मालमत्तेचा वाद?

Published On: Apr 24 2018 2:02AM | Last Updated: Apr 24 2018 12:55AMमुंबई : प्रतिनिधी

शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचीन सावंत (46) यांच्या हत्येमागे एसआरए प्रकल्प आणि मालमत्तेचा वाद असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली असून गुन्हेशाखाही हल्लेखोरांचा शोध घेत आहे. 

कांदिवलीतील आकुर्ली रोडवरुन रविवारी रात्री आठच्या सुमारास मित्रासोबत बुलेटने जात असलेल्या सावंत यांच्यावर रस्त्याच्याकडेला दबा धरुन बसलेल्या दोघांनी चार राऊंड फायर करुन पळ काढला. गोळ्या छातीमध्ये झाडल्या गेल्याने उपचारांपूर्वीच सावंत यांचा मृत्यू झाला होता. सावंत यांचा 20 वर्षीय मुलगा ओंकार याची फिर्याद नोंदवून घेत कुरार पोलिसांनी अज्ञाताविरोधात हत्येच्या भादंवी कलम 302 आणि 34 याच्यासह बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सावंत हे शाखा क्रमांक 39 चे उपशाखाप्रमुख होते. त्यांना पुन्हा एकदा नव्याने पदभार देत शाखा प्रमुख बनविण्यात येणार होते, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते. गेल्या काही दिवसांपासून ते शाखेत येऊन बसायचे सुद्धा मात्र शाखाप्रमुख बनण्याआधीच त्यांची हत्या करण्यात आली.  सावंत यांच्या हत्येमागे राजकीय वाद नसल्याचे बोलले जाते. मात्र काही दिवसांपूर्वीच सावंत यांनी एका मालमत्तेचा व्यवहार केला होता. तसेच काही एसआरए प्रकल्प सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत येत असल्याने याच वादातून त्यांचा काटा काढण्यात आल्याचे बोलले जाते.

Tags : Mumbai, Malad Shiv Sainik, murder, Property dispute, Mumbai news,