Sun, May 26, 2019 00:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जातवैधता मुदतवाढीचा प्रस्ताव लांबणीवर 

जातवैधता मुदतवाढीचा प्रस्ताव लांबणीवर 

Published On: Sep 05 2018 7:44AM | Last Updated: Sep 05 2018 2:42AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवरून निवडून आलेल्यांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. हा प्रस्ताव मंगळवारी मंत्रिमंडळाला सादर करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, तांत्रिक बाबी पूर्ण होऊ न शकल्याने हा प्रस्ताव आलाच नाही. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. 

निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या 19 नगरसेवकांचे नगरसेवकपद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या निर्णयामुळे राखीव जागांवर निवडून आलेल्या राज्यातील सुमारे 9 ते दहा हजार लोकप्रतिनिधींचे पद धोक्यात आले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेली सहा महिन्यांची मुदत वाढवून देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. 

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, प्रस्तावाची तांत्रिक बाजू पूर्ण होऊ न शकल्याने हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे चर्चेला आला नाही. मात्र, पुढच्या आठवड्यात हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.