Fri, Sep 21, 2018 11:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उत्तम खोब्रागडे यांच्या घरावर उद्या रिपाईचे निषेध आंदोलन

उत्तम खोब्रागडे यांच्या घरावर उद्या रिपाईचे निषेध आंदोलन

Published On: Feb 10 2018 2:47PM | Last Updated: Feb 10 2018 2:47PMमुंबई : प्रतिनिधी

माजी सनदी अधिकारी आणि माजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उत्तम खोब्रागडे यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. त्याच्या काँग्रेस प्रवेशामुळे आंबेडकरी जनतेतून मोठा निषेध केला जात आहे. तर काँग्रेसमध्ये प्रवेश करुन त्यांनी आंबेडकरी चळवळीचा विश्वासघात केला असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी व्यक्त केले आहे. तर ख्रोबरागडेंच्या घरावर उद्या रविवार दुपारी २ वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की,  निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांना रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आले. मात्र त्यांनी पक्षाचे काही काम केले नाही. स्वार्थासाठी रिपब्लिकन पक्षाशी गद्दारी करून थेट काँग्रेस प्रवेश करणाऱ्या उत्तम खोबरागडेंच्या काँग्रेसला ही काही उपयोग होणार नाही. तर त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये त्यांनी संरक्षणासाठी रिपाई पक्षाचा वापर केला. अशा गद्दार प्रवृत्तीच्या लोकांना आंबेडकरी जनता जरूर जागा दाखवून देईल, असेही या पत्रकात म्हटले आहे.