Thu, Jun 27, 2019 11:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नीरव मोदीला प्रियांकाची नोटीस

नीरव मोदीला प्रियांकाची नोटीस

Published On: Feb 15 2018 4:44PM | Last Updated: Feb 15 2018 4:44PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी नीरव मोदीला अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नोटीस पाठवली आहे. तिने हिरे व्यापारी नीरव मोदीवर फसवणुकीचा आरोप केला आहे. मोदीच्या मालकीचे असलेल्या कंपनीतील हिऱ्यांच्या दागिन्यांची जाहिरात प्रियांकाने केली होती त्या जाहिरातीचे पैसे नीरव मोदीने  दिले नसल्याचे तीने म्हटले आहे. 

वाचा : पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ५०० कोटींचा घोटाळा

अभिनेत्री प्रियांकाने यापूर्वीच नीरव मोदीच्या कंपनीबरोबरचा करार रद्द केला आहे. तिने आणि तिच्या कंपनीने नीरव यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. प्रियांकाने नीरव मोदीबरोबर जानेवारी २०१७ मध्ये ज्वेलर्सच्या जाहिरातीबाबत करार केला होता. प्रियांकासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यानेही काम केले होते. तसेच यापुर्वी अभिनेत्री लिसा हेडन हिने नीरव मोदीच्या कंपनीसाठी जाहिरातीत काम केले आहे. 

वाचा : नीरव मोदीच PNB घोटाळ्याचा मास्टरमाईंड

हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी साथीदार आणि पंजाब नॅशनल बँकेतील अधिकाऱ्यांच्या मदतीने बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रीच कँडी शाखेत 280 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार बँकेकडून अगोदरच देण्यात आली आहे. त्याच्या तापसात घोटाळ्याची व्याप्ती 11 हजार 300 कोटी असल्याचे उघड झाले. नीरव मोदी यांची आई, पत्नी आणि भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती मिळते. शिवाय पीएनबीने या आरोपींविरोधात सीबीआयला लूकआऊट नोटीस जारी करण्यास सांगितल्याचे समजते.

वाचा : PNB म्हणजे नवा #Modiscam?; काँग्रेसचे टीकास्त्र

वाचा : भारताबाहेर पळालेले नीरव मोदी आहेत तरी  कोण?