होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्राचार्यांची रिक्‍त पदे तातडीने भरा

प्राचार्यांची रिक्‍त पदे तातडीने भरा

Published On: Apr 24 2018 2:02AM | Last Updated: Apr 24 2018 1:37AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील विद्यापीठाशी संलग्‍न असलेल्या महाविद्यालयातील प्राचार्यांची रिक्त असलेली पदे गेली कित्येक वर्षे रिक्‍त आहेत. अनेक महाविद्यालयांत प्रभारी म्हणूनच हे पद कार्यरत आहे. ही पदे तातडीने भरण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांना दिले आहेत.

उच्चशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य या संवर्गाचे पद हे एकाकी पद असून ते महाविद्यालयातील दैनंदिन प्र्रशासकीय तसेच शैक्षणिक कामकाजासाठी हे पद गरजेचे आहे. रिक्‍त पदे ही उच्चशिक्षणासमोरील मुख्य समस्या बनली आहे. प्राचार्य, शिक्षकांच्या जागा रिक्त असलेल्या महाविद्यालयांनी पाच वर्षे पूर्ण केलेली ही पदे भरायची आहेत. नव्याने भरलेल्या प्राचार्यांना तत्काळ मान्यता देण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.