होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा पहिला मान महाराष्ट्राला!

ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा पहिला मान महाराष्ट्राला!

Published On: Feb 19 2018 1:59AM | Last Updated: Feb 19 2018 1:59AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

केंद्र सरकारने देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, देशात एक लाख कोटीचा म्हणजे ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा पहिला मान हा सर्वप्रथम महाराष्ट्राला मिळेल, असा ठाम विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्‍त केला. बदलत्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे गौरवोद‍्गार त्यांनी काढले. महाराष्ट्राचे आकर्षण उद्योग जगताला आहेच; पण केंद्राच्या जवळ असल्याचादेखील लाभ महाराष्ट्राला मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. 2025 पर्यंत राज्याची वन ट्रिलियन अर्थव्यवस्था हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा ध्यास असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बांद्रा-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलेल्या मॅग्‍नेटिक महाराष्ट्र समिटचेबांद्रा कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलेल्या मैग्नेटिक महाराष्ट्र समिटचे उद्धघाटन रविवारी सायंकाळी मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, रामदास आठवले ,टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा, रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी, महिंद्राचे आनंद महिंद्र, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, गोदरेज समूहाचे आदि गोदरेज, व्हर्जिन समूहाचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन, वेदांत समूहाचे अनिल अगरवाल आणि देश, विदेशातिल उद्योग जगतातील नामवंत उद्योजग उपस्थित होते. 

समर्थ व संपन्न महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी होणार्‍या या मॅग्नेटिक महाराष्ट्राला माझ्या शुभेच्छा अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली.

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2025 पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याने ठरविले तर काहीही अशक्य नाही. महाराष्ट्र हे धेय्य नक्कीच गाठेल. महाराष्ट्राचा जलद गतीने होणारा विकास हा देशाच्या बदलत्या पारिस्थिचे व सामर्थयाचे प्रतीक आहे, असेही त्यांनी सांगितले. 

देशातील आर्थिक परिस्थिती वेगाने बदलत आहे. देश पहिल्यांदा ट्रिलियन अर्थव्यवस्था झाल्यानंतर कौतुक झाले. मात्र, नंतर मागील सरकारच्या काळात मोठे आर्थिक घोटाले सुरु झाले आणि देशातील वातावरण बिघडले. घोटाळ्यांमुळे अर्थववस्थेची गतीच रोखली गेली. मात्र, आता तीन वर्षाच्या कार्यकाळात देशातील वातवरण बदलून गेले असून अर्थव्यवस्था पुन्हा रुलावर आली आहे, असे मोदी म्हणाले. 

फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देखील गतिमान झाली असून समृद्धि महामार्ग, ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो प्रकल्पांमुळे देशालाच नाही तर जगताला महाराष्ट्राचे चुम्बकीय आकर्षण निर्माण झाले असल्याचे उद्द्गार काढून ते म्हणाले, महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षांत ईझ ऑफ डुइंग बिझनेससाठी उद्यमस्नेही उपाययोजना केल्या. नियम-प्रशासकीय प्रक्रियेत सुधारणा केल्या. कारभारात कार्यक्षमतेला वाव देणारी कार्यसंस्कृती आणली. त्याचा उपयोग वातावरण बदलण्यास झाला आहे. 2016-17 मध्ये देशात आलेल्या गुंतवणुकीपैकी 51 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली. दोन वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया परिषदेतील सामंजस्य करारापैकी निम्म्याहून अधिक गुंतवणूक ही प्रत्यक्षात आलेली आहे. त्यावरून राज्याची प्रशासकीय क्षमताही दिसून आल्याचेही मोदी म्हणाले. 

गेल्या चार वर्षांत आम्ही 1400 कायदे रद्द केल्याचे नमूद करत मोदी यांनी केंद्र सरकार करत असलेल्या कामांचा-सुधारणांचा आढावा घेतला. नवीन कायदे करताना सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप व सरकारवरील कमीत कमी अवलंबित्व हे तत्त्व ठेवले आहे, असेही मोदी यांनी सांगितले.