Tue, Mar 19, 2019 05:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘झेरॉक्स’च्या किमती वाढल्या!

‘झेरॉक्स’च्या किमती वाढल्या!

Published On: Sep 06 2018 1:55AM | Last Updated: Sep 06 2018 1:46AMमुंबई : प्रतिनिधी  

कागद, टोनर आणि वीजबिलात झालेली वाढ यामुळे शासकीय कामापासून ते शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या गरजेचा असलेला झेरॉक्स (छायांकित प्रत) महागला आहे. मुंबईसह उपनगरांतील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी झेरॉक्सच्या दरात वाढ केली असून दरपत्रक दुकानात लावले आहेत.  

प्लॅस्टिकबंदीनंतर कागदाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. झेरॉक्सला लागणार्‍या शाईच्या दरातही वाढ झाली आहे. मशीन मेंटेनन्स आणि इतर खर्च वाढल्याने व्यावसायिक आर्थिक अडचणीत आल्याचे सांगत आहेत. गेल्या काही वर्षांपासून झेरॉक्सचे दर कायम आहेत. कित्येकवर्ष ते वाढले नव्हते. जास्त प्रती काढल्यास कॉपीला वेगळे पैसे, तर प्रतिकॉपी 1 रुपयानेे दिला जात असल्याने अडचणी येत असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. त्यामुळे झेरॉक्स व्यावसायिकांनी पहिल्या 50 कॉपींना 2 रुपये दर केला आहे. त्यानंतरच्या  कापीला 1 रुपये 50 रुपये आणि त्यानंतर 1 रुपये 25 पैसे दर केले आहेत. त्यामुळे कमी प्रत काढणार्‍या सर्वसामान्यांना आता मोठा अर्थिक फटका बसला आहे.

झेरॉक्सला वापरणार्‍या 70 जीएसएम 500 कागद असलेल्या रिम 132 ते 135 रुपयांना पूर्वी मिळत होती. आता त्याच कागदाच्या रिमची किंमत 172 रुपये झाली आहे. प्रत्येक कागदाच्या रिमला 50 रुपये जादा द्यावे लागत आहेत. झेरॉक्स लागणार्‍या शाई टोनरच्या भावातही वाढ झाली आहे. 500 रुपयांपर्यंत मिळणारा टोनर आता 800 रुपयांना मिळत आहे. त्याचबरोबर झेरॉक्ससाठी लागणारी वीज, टोनर आणि मशीन मेंटेन्सस अशा सर्व खर्चाचा विचार करता एका प्रतीसाठी खर्च जास्त येत असल्याने झेरॉक्सची एक प्रत 1 रुपयात देणे आता परवडत नाही त्यामुळे ही वाढ बर्‍याच वर्षानी केल्याचे व्यावसायिकांनी म्हटले आहे.