Wed, Jan 22, 2020 21:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राष्ट्रपती येती सूरदेवतेच्या घरा...

राष्ट्रपती येती सूरदेवतेच्या घरा...

Published On: Aug 19 2019 1:34AM | Last Updated: Aug 19 2019 1:27AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या विसाव्याचे क्षण रविवारी मोहरून गेले. दस्तुरखुद्द देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी यावेळी लतादीदींच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. राष्ट्रपतींनी ही भेट ट्विटरवरून शेअर केली. राष्ट्रपती कोविंद यांनी त्यात म्हटले आहे की, लता मंगेशकरजींची सदिच्छा भेट घेतल्याने आनंद वाटला. मी त्यांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मधूर आवाजाने त्यांनी देशाचा गौरव तर वाढवलाच, त्यासह सर्वांच्या आयुष्यात गोडवाही निर्माण केला आहे. त्यांचा साधेपणा आणि सौम्य स्वभाव सगळ्यांनाच भावतो. 

राष्ट्रपतींच्या ट्विटनंतर लतादीदींनीही ट्विट केले. त्या म्हणतात, आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद मोठ्या मनाने आज घरी आले. मला फार प्रसन्न वाटले. मी आभारी आहे. सर, तुम्ही आमचा गौरव केला.