Responsive image


संभाजी भिडेंच्या अटकेसाठी एल्गार (video)

Published On: | Last Updated:


मुंबई : प्रतिनिधी 

कोरेगाव- भिमा येथील हिंसाचारमागील मुख्य सूत्रधार असलेल्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यातील आंबेडकरी अनुयांयानी आझाद मैदानात एल्गार आंदोलन सुरू केले आहे. या एल्गार मार्चमध्ये दलित समाजाबरोबरच मराठा, मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला आहे. आझाद मैदानावर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत. 

या आंदोलनासाठी मुंबई शहर, उपनगरासह  अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, जालना, नाशिक, इगतपुरी, जळगांव येथील आंदोलक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. सीएसटीहून जथ्थेच्या जथ्थे आझाद मैदानाकडे जाताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असताना सुध्दा हजारो कार्यकर्ते भायखळा येथून एल्गार मार्च काढत आझाद मैदानाकडे पोहचत आहेत. त्यामुळे मुंबईबाहेरून येणारे अनेक कार्यकर्ते पूर्वीच्या ठरलेल्या ठिकाणी अर्थात भायखळा येथे पोहोचले आहेत. त्यांना आझाद मैदानावर येण्याच्या सूचना मोर्चाचे निमंत्रक तथा भारिप-बहुजन महासंघाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर देत आहेत. त्याचबरोबर या मोर्चामध्ये सामाजिक सलोखा राखण्याच्या विचाराचे असलेल्या अनेक समाजाच्या संघटना यात सहभागी होणार आहेत. 

लिंगायत, मराठा आणि मुस्लिम समाजातील काही संघटना यात सहभागी होणार आहेत. त्यानंतर या आंदोलनाचे जाहीर सभेत रूपांतर होईल आणि त्यानंतर संभाजी भिडे यांना अटक करण्यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधान भवनात जावून देणार असल्याचेही अॅड.आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

Tags : Prakash Ambedkar, protest, march, Mumbai, Hindutva leader, Sambhaji Bhide