Thu, Apr 25, 2019 17:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवई पोलिसांवर हल्ला करणार्‍या त्रिकुटास अटक

पवई पोलिसांवर हल्ला करणार्‍या त्रिकुटास अटक

Published On: Jan 09 2018 2:03AM | Last Updated: Jan 09 2018 1:32AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मुंबई बंद दरम्यान पवई पोलिसांवर दगडफेक करून त्यांची वाहने पेटवणार्‍या विशाल विलास कदम, आकाश चंद्रकांत कांबळे, पीरमोहम्मद अब्दुल माजिद खान या त्रिकुटास पवई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न, दंगलीसह शासकीय व खासगी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 

भीमा-कोरेगाव हिसंक घटनेनंतर दलित संघटनेने 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मुंबई बंददरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र पोलीस बंदोबस्त होता. मिलिंदनगर परिसरात काही जमाव रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांवर दगडफेक करीत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी 100 ते 150 जणांच्या जमावाला शांत राहण्याचे आवाहन करूनही जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. पेट्रोल ओतून तीन वाहने पेटवून दिली. या दगडफेकीत काही पोलिसांसह इतर लोक जखमी झाले होते. पवई पोलिसांनी दंगल, हत्येचा प्रयत्नासह विविध भादवी कलम तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम कलम, क्रिमिनल लॉ अमेन्डमेंट कलम, महाराष्ट्र  पोलीस अधिनियम कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता. तिघेही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्यांत प्रकाश ऊर्फ बाबा बिर्‍हाडे, प्रकाश कांबळे, संदीपसह 100 ते 125 जणांना पाहिजे आरोपी दाखवण्यात आले आहे.