Fri, Jul 19, 2019 15:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिद्रे बेपत्ता प्रकरण : राजेशमुळे कुरुंदकर ’एलसीबी’त

बिद्रे बेपत्ता प्रकरण : राजेशमुळे कुरुंदकर ’एलसीबी’त

Published On: Dec 13 2017 2:30AM | Last Updated: Dec 13 2017 2:30AM

बुकमार्क करा

नवी मुंबई : राजेंद्र पाटील 

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात अटकेत असलेले भाजपचे ज्येष्ठ  नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याच्या मध्यस्थीतून अभय कुरुंदकर ठाणे ग्रामीण एलसीबीमध्ये आल्याची माहिती पुढे येत आहे. राजेशचा राजकीय नेत्यांच्या खासगी सचिवांशी चांगले संबंध असल्याने तो पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करत असल्याचेही कळते. 

 पनवेल पोलिसांनी अभय कुरुंदकरांना 7 डिसेंबर रोजी ठाण्यातून अटक केली होती. त्यापाठोपाठ राजेश पाटील याला जळगाव येथून बोदवड येथून ताब्यात घेत अटक केली. कुरुंदकर बोदवडला असताना त्यांची राजेशशी मैत्री झाली होती. कुरुंदकर यांनी त्या मैत्रीचा वापर आपल्या पोलीस खात्यातील क्रिम पोस्टिंगसाठी केल्याचे बोलले जात आहे. 

अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांची मंगळवारी  स्वतंत्रपणे 18 तास वेगवगेळ्या पोलीस ठाण्यात 13 पोलीस अधिकार्‍यांच्या पथकाने चौकशीकेली. या चौकशीतून अनेक महत्त्वाच्या बाबीचा उलगडा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.  अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्यानंतर कुरुंदकर यांच्याशी राजेशचे कितीवेळा आणि किती तास बोलणे झाले याचा डाटा तपास यंत्रणेने मागवला आहे. 

कुरुंदकर यांना मीरा रोड येथे भेटण्यासाठी येणारे लोक, सोसायटीच्या नोंदवही त्यांची नोंद घेतली आहे का, सोसायटीतील त्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलची महिन्याभरातील लोकेशन, कुरुंदकर यांचे सरकारी व खासगी वाहन त्यावेळी कुठे होते, याविषयी माहिती घेण्यात येत आहे.