Mon, Apr 22, 2019 21:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेचे काल खळ्ळखट्याक आज पोस्टरवॉर

मनसेचे काल खळ्ळखट्याक आज पोस्टरवॉर

Published On: Dec 02 2017 9:29AM | Last Updated: Dec 02 2017 2:01PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मनसेकडून आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्यानंतर आता महाराष्ट नवनिर्माण सेनेने मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घरासमोर आक्षेपार्ह फलक लावले आहेत. यामुळे पुन्हा एकदा मनसे आणि निरूपम वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निरुपम यांच्या अंधेरी येथील लोखंडवाडा सोसायटीलगत मनसेकडून पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर निरुपम यांचा परप्रांतीय भटका कुत्रा असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे निरूपम यांच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

मुंबई : मनसेचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला, तिघे ताब्यात
काँग्रेस कार्यालयावरील हल्‍ला; मनसेने जबाबदारी स्‍वीकारली 
नुकसानीची भरपाई मनसेने द्यावी : अशोक चव्हाण

शुक्रवारच्या वादानंतर शनिवारी मध्यरात्री  काँग्रेसच्या वांद्रे खेरवाडीमधील संपर्क कार्यालयावर रात्री अज्ञातांकडून शाईफेक करण्यात आली. तर काही प्रमाणात तोडफोडही करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मनसेचे खळ्ळखट्याक!
मनसेला हॉकर्स भूषण द्यायचा का ?
Video : मनसेने सुपारी देऊन गुंड पाठवले : सचिन सावंत


No automatic alt text available.