Sun, Apr 21, 2019 01:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील सगळ्यात जुन्या महाविद्यालयात महाराष्ट्र प्रदूषण नियमाक मंडळाचा विशेष उपक्रम

विलसन महाविद्यालयात स्टार रेटिंग कार्यक्रम कार्यशाळा

Published On: Aug 10 2018 7:49PM | Last Updated: Aug 10 2018 7:49PMमुंबई :  

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरु केलेल्या स्टार रेटिंग कार्यक्रमाबाबत एक विशेष कार्यशाळा मुंबईच्या प्रसिद्ध विलसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेली. या कार्यशाळेत जवळ-जवळ १०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. हे विद्यार्थी विद्यालयाच्या राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व विज्ञान विभागात शिकतात. लोकांनी पुढाकार घेऊन याबाबत सरकार व उद्योगांशी संवाद साधावा आणि सामान्य माणसाचा आवाज या लोकांपुढे मांडावा असा विचार काही विद्वान मांडतात. याच विचारला धरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘स्टार रेटिंग’ कार्यक्रमास मागच्या वर्षी सुरुवात केली होती. मुंबईत तसे वायु प्रदूषण नियंत्रणाबाबत खूप कार्यक्रम होत राहतात. पण ‘स्टार रेटिंग’ सारखा उपक्रम, उद्योगांच्या सावलीत राहणाऱ्या मुंबई शहरात कसा वापरला जाऊ शकतो या विचारस धरून हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला. MPCB नेमके उद्योगांकाढणं वायु प्रदुषणासाठी नमुने कसे एकत्रित करतात, हे नमुने वापरून प्रदूषण नियंत्रण मंडळ या उद्योगांना स्टार रेटिंग कसे देते व या सारख्या विषयांवर चर्चा केली. स्टार रेटिंग वेबसाईट वापरून आप-आपल्या जिल्ह्यात किती उद्योग जास्त प्रदूषण करतात व त्यावर नागरिक म्हणून आपण कसा पुढाकार घेऊ शकतो याबाबत एपिक इंडियाच्या ईशान चौधरी ह्यांनी संवाद साधला.  

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचा (MPCB) स्टार रेटींग कार्यक्रम काय आहे?

या नवीन योजने अंतर्गत औद्योगिक संस्थांना त्यांच्या औद्योगिक वायु उत्सर्जनाच्या प्रमाणावरून 1 ते 5 तारांकन देण्यात आले आहे. 1 तारांकन प्राप्त औद्योगिक संस्था ही जास्त प्रदुषण कारक म्हणजेच MPCB मान्यंताचे कमी पालन करणारी तर 5 तारांकन प्राप्त संस्था ही मान्यतांचे उत्तम पालन करणारी म्हणजेच अतिशय कमी प्रदुषण कारक संस्था असेल. औद्योगिक संस्था, शासन तसेच सामान्य जनता देखील MPCB वेबसाईटवर जाऊन आपल्या विभागातील औद्योगिक संस्थांचे तारांकन पाहु शकतील. आपल्या विभागातील औद्योगिक संस्था सहज शोधण्यासाठी विभाग, क्षेत्र तसेच तारांकन या तीन विभागांचा आधार देखील घेऊ शकतील.

या कार्यक्रमाशी साधर्म्य असणारे कार्यक्रम अमेरिका, कॅनडा, चीन, घाना, फिलीपिन्स आणि युक्रेन या देशातही सुरू करण्यात आले आहते. महाराष्ट्रातील कार्यक्रम हा पहीला मापदंड ठरत आहे उत्सर्यन मोजण्याचा जो अब्दुल लतिफ, जमिल पॉवर्टी एक्शन लॅब (JPAL), एनर्जी पॉलीसी इनस्टीटयुट ॲट द युनीवर्सीटी ऑफ शिकागो(EPIC – India), एव्हीडन्स फॉर पॉलिसी डिझाइन ऑफ  हॉवर्ड युनीवर्सीटी (EPoD) आणि टाटा सेंटर फॅर डेव्हलपमेंट सारख्या संशोधकांच्या मदतीने पुर्ण होत आहे.

स्टार रेटींग कार्यक्रम हा मुख्यत्त्वे करून प्रदुषित औद्योगिक वायु उत्सर्जना संदर्भात कार्ये करतो. भरतातील औद्योगिककरणाचे माहेरघर असलेल महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी आदर्श ठरतो. राज्यातील ७५००० औद्योगिक संस्थांपैकी १२५५ संस्था संभाव्य उच्च्य वायु प्रदुशानकारक म्हणून ओळखल्या गेल्या आहेत. स्टार रेटिंग कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर या संस्थांबरोबरसुरु झालाय. यामागे MPCB चा माहिती संग्रहवाढवणे हा देखील उद्देश आहे.