Sun, Aug 18, 2019 20:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजकीय पक्षांच्या पेटीत ७१० कोटी रुपयांचे गुप्तदान

राजकीय पक्षांना ७१० कोटी रुपयांचे गुप्तदान

Published On: May 31 2018 1:42AM | Last Updated: May 31 2018 9:58AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

देशातील विविध उद्योगपतींनी आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये सात राष्ट्रीय राजकीय पक्षांना सुमारे 1559.17 कोटी रुपये दान दिले आहेत. तर 710.80 कोटी रुपये कोणी दिले याचा हिशोबच लागत नसल्याने या गुप्तदानाविषयी राजकीय पक्षामध्ये उलटसूलट चर्चा सुरु आहे. 

राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देण्यामध्ये सत्या इलेक्ट्रॉल ट्रस्ट आघाडीवर आहे. या ट्रस्ट ने भाजपाला 251.22 कोटी तर काँग्रेसला 13.90 कोटी रुपये देणगी दिली. याशिवाय भाजपाला बलराम जनहित शालिकाने 30 कोटी, राज वेस्ट पॉवरने काँग्रेसला 5 कोटी, राष्ट्रवादी काँग्रेसला बीजी शिर्के कन्ट्रक्शन टेक्नालॉजी प्रायवेट लिमिटेड ने 2 कोटी तर ए.एन. एंटरप्राइजेज इंफ्रा सर्विसेस प्रायवेट लिमिटेडने 1.10 कोटी रुपये देणगी दिली.

नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. देणगीदारांनी राष्ट्रीय पक्षांना 589.38 कोटी रुपये दान दिले आहेत. याशिवाय या पक्षांकडे स्वतःच्या संपत्तीची विक्री,सदस्यता शुल्क, बँकेतील रकमेवरील व्याजापोटी 258.99 कोटी रुपये जमा झाले आहेत. 

आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये विविध राजकीय पक्षाना 102 .02 कोटी रुपये दान मिळाले.  त्यामध्ये 2016-17 मध्ये  478 टक्के वाढ झाली. 2015-16 मध्ये भाजपला 76.85 कोटी रुपये मिळाले होते. 2016-17 मध्ये 2 हजार 123 देणगीदारांनी राष्ट्रीय पक्षाना 589.38 कोटी रुपये दिले. त्यामधील 1194 दानशुरांनी भाजपला 532.27 कोटी, 599 व्यक्तींनी काँग्रेसला 41.90 कोटी रुपये देणगी दिली.  

राष्ट्रवादी काँग्रेसला 22 व्यक्तींनी 6.34 कोटी रुपये, सीपीएमला 200 दानशुरानी 5.25 कोटी, तृणमुल काँग्रेसला 12 देणगीदारांनी 2.15 कोटी तर सीपीआयला 96 व्यक्तींकडुन 1.44 कोटी रुपये देणगी मिळाली. गतवर्षीच्या तुलनेने तृणमूल काँग्रेसच्या पेटीत 231 टक्के तर सीपीएमच्या 190 च्या रकमेत 105 टक्के वाढ झाली.

आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये राजकीय पक्षाना 1.45 कोटी रुपये देणगी मिळाली होती. त्यावर रोख रक्कम दान देणार्‍या संस्था आणि उद्योगपतींना आयकरामध्ये सवलत देण्याची घोषणा निवडणुक आयोगाने केली होती. पण त्याचा उलट परिणाम झाला.  2016-17 मध्ये राजकीय पक्षांना केवळ 52.27 लाख रुपये देणगी मिळाली. देणगीच्या स्वरुपात सर्वाधिक 22 लाख 61 हजार रोख रक्कम सीपीआयला, सीपीएम 14.84 तर काँग्रेसला केवळ 14.82 लाख रुपये मिळाले.