Thu, Nov 15, 2018 03:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने ड्युटीवरच मृत्यू

पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने ड्युटीवरच मृत्यू

Published On: Dec 04 2017 1:58AM | Last Updated: Dec 04 2017 1:27AM

बुकमार्क करा

जव्हार : वार्ताहर

जव्हारमध्ये नोकरी बजावताना रवींद्र जहांगीर खर्डे (43) यांचा शनिवारी वसई हायवेजवळ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. रवींद्र खर्डे पोलीस ठाण्यात काम करायचे. त्यांना शनिवारी कैदी सोडवायचे होते. 

जव्हार पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी कमी असल्यामुळे ते स्वतः आरोपींना सोडण्यासाठी ठाण्याला गेले. मात्र, तेथून परतत असताना खर्डे यांना वसई  हायवेजवळ हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या मृत्युमुळे पोलीस वर्तुळावर शोककळा पसरली आहे.