Thu, Jun 27, 2019 02:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भरतीप्रकरणी पोलीस निलंबित

भरतीप्रकरणी पोलीस निलंबित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : दिलीप शिंदे

ठाणे पोलीस आयुक्तालयातील 238 रिक्त पोलीस शिपायांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. दुपारच्या वेळी  मैदान सोडून घरी जाणे हे पोलीस नाईक नानाभाऊ गोसावी यांना चांगलेच महागात पडले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर मित्राच्या मदतीसाठी उमेदवार बनून मैदानात उतरलेल्या एका सांगली पोलिसाचा भांडाफोड करणारी घटना आज उघडकीस आली असून एका उमेदवाराने मादकद्रव्य घेण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. 

सुमारे 50 हजार उमेदवार आपले नशीब आजमावत असून त्यात  9 हजार 566 उमेदवार पदवीधर असून 4 हजार 777 उमेदवार पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. या भरतीमध्ये डमी उमेदवार टाळण्यासाठी बायोमेट्रीकपासून सीसीटीव्ही कॅमेरांनी करडी नजर ठेवली जात आहे. असे असताना बुधवारी एका उमेदवाराला माद्रकद्रव्य घेताना पकडण्यात आले. 

तर दुसरा पकडला गेलेला उमेदवार हा पोलीस निघाला. तो सांगली जिल्ह्यात पोलीस शिपाई म्हणून अगोदरच भरती झालेला आहे. हक्क रजेवर असताना तो दाढी वाढवून भरतीसाठी मैदानात उतरला होता. त्याच्यासोबत प्रशिक्षण घेतलेल्या ठाण्यातील एका पोलिसाने त्याला ओळखले आणि त्याचे पितळ उघडे पडले. आपल्या मित्राच्या मदतीसाठी मैदानात उतरल्याचे त्याने वरिष्ठ अधिकार्‍यांना लिहून दिल्याचे समजते. त्याबाबतचा अहवाल ठाणे पोलिसांकडून लवकरच सांगली पोलिसांना पाठविला जाणार आहे.

Tags : mumbai news, recruitment case, Police suspended,


  •