Sat, Nov 17, 2018 23:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसाच्या मुलाचे गोरेगावातून अपहरण?

पोलिसाच्या मुलाचे गोरेगावातून अपहरण?

Published On: Mar 25 2018 2:17AM | Last Updated: Mar 25 2018 1:52AMमुंबई : प्रतिनिधी

कॉलेजमध्ये जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या एका पोलीस हवालदाराच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना गोरेगावमध्ये समोर आली आहे. राज्य राखीव पोलीस बलामध्ये पोलीस हवालदार पदावर कार्यरत असलेले पुंडलीक चव्हाण (42) हे कुटूंबासोबत गोरेगाव पुर्वेकडील पोलीस वसाहतीमध्ये राहातात. त्यांचा 17 वर्षीय मोठा मुलगा अंधेरीतील एका नामांकीत कॉलेजमध्ये सायन्स शाखेत शिक्षण घेतो. नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास तो कॉलेजला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला.

मुलाला नवीन शिकवणीला जायचे असल्याने त्याला पैसे देण्यासाठी चव्हाण हे दुपारी चार वाजता त्याला अंधेरी स्थानकाजवळ भेटणार होते. बराच वेळ वाट बघूनही मुलगा न आल्याने त्यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क केला. मोबाईल बंद आल्याने चव्हाण यांनी कॉलेजला जाऊन मुलाबाबत विचारणा केली. त्याचे शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींनी तो कॉलेजला आलाच नसल्याचे सांगितले. मुलगा घरीही आला नव्हता. चव्हाण यांनी नातेवाईकांकडे, तसेच गावी फोन करुन मुलाबाबत चौकशी केली. तसेच रात्रभर वाट बघूनही तो न परतल्याने अखेर शुक्रवारी सकाळी वनराई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मुलगा अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags : mumbai, crime news, Police son,  kidnapped, Goregaon,