Sat, Aug 24, 2019 23:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केवळ ‘प्रतिष्ठे’चे पोलीस संरक्षण आता बंद

केवळ ‘प्रतिष्ठे’चे पोलीस संरक्षण आता बंद

Published On: Jan 08 2018 1:27AM | Last Updated: Jan 08 2018 1:04AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

हक्क म्हणून किंवा केवळ पद्धत म्हणून शुल्क भरून पोलीस सुरक्षा दिली जाणार नाही. जीवितास खरोखरच धोका असेल तर जनहित जपण्यासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे. संरक्षण शुल्काची हमी म्हणून तीन महिन्यांचे शुल्क बँक गॅरंटीच्या स्वरूपात घेण्यात यावे, दर तीन महिन्यांनी संबंधित पोलीस कर्मचार्‍याची बदली करण्यात यावी, अशा सूचना गृहविभागाने दिल्या आहेत.

बड्या धेंडांसाठी बर्‍याचवेळा केवळ प्रतिष्ठेसाठी सुरक्षा पुरविण्यात येते.  त्यासाठीचे शुल्क भरण्यास देखील टाळाटाळ करण्यात येतेे. मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या आदेशानुसार नव्या सूचना गृहविभागाने तयार केल्या आहेत.  

दर तीन महिन्यांनी आढावा 

पोलीस संरक्षणाचा कालावधी व ते किती द्यायचे याचा निर्णय पोलीस अधिक्षक, आयुक्तांनी घ्यावा. प्राथमिक चौकशीनंतर पुरविण्यात आलेल्या संरक्षणाच्या प्रकरणाबाबत लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी. त्यात जर काहीच तथ्य आढळले नाही, तर संरक्षण काढून घेण्यात यावे. दर तीन महिन्यांनी आयुक्त स्तरावरील समितीने पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेल्या व्यक्तींना असणार्‍या धोक्याचा आढवा घेऊन संरक्षण वाढवायचे की काढून घ्यायचे याबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.