Sun, Aug 18, 2019 14:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसानेच केले व्यापार्‍याच्या मुलाचे अपहरण

पोलिसानेच केले व्यापार्‍याच्या मुलाचे अपहरण

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 12:38AMठाणे : प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करणार्‍या ठाण्यातील एका पोलीस आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलिसाने तक्रारदार व्यापार्‍याकडून दोन लाखांची खंडणी उकळून आणखी दहा लाखांची मागणी केली होती. दिपक वैरागड (33, रा. वर्तकनगर पोलीस वसाहत, ठाणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव असून तो वर्तकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

तसेच त्याचा साथीदार सोहेल राजपूत (23, रा. राबोडी, ठाणे) याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात येऊन या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. याप्रकरणात त्यांनी ओलीस ठेवलेल्या व्यापार्‍याच्या मुलाचीही सुखरूप सुटका पोलिसांनी केली. 

पोलीस पथकाने केलेल्या तपासात हे अपहरण एका पोलिसानेच केल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ उडाली. तर ठाणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करून त्यांनी ओलीस ठेवलेल्या व्यापार्‍याच्या मुलाचीही सुखरूप सुटका केली. सुरुवातीला हे प्रकरण ठाणे ग्रामीणच्या कार्यक्षेत्रातील काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, या गुन्ह्याची सुरुवात ठाणे शहर पोलिसांच्या वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील येऊरच्या एका खोलीतून झाली. त्यामुळे हे प्रकरण आता वर्तकनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.