Wed, Jul 17, 2019 00:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिंद्रे प्रकरण : कुरूंदकर, राजेश पाटील यांना १९पर्यंत कोठडी 

बिंद्रे प्रकरण : कुरूंदकर, राजेश पाटील यांना १९पर्यंत कोठडी 

Published On: Dec 15 2017 6:50PM | Last Updated: Dec 15 2017 6:50PM

बुकमार्क करा

पनवेल : प्रतिनिधी

महिला पोलिस अधिकारी आश्विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलिस निरीक्षक अभय करूंदकर आणि राजेश पाटील यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. पनवेल न्यायालयाने या दोघांना १९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासात दोघे आरोपी सहकार्य करत नसल्याने तसेच पोलिस निरीक्षक अभय करूंदकर वापरत असलेली गाडी जप्त करण्यासाठी पोलिसांनी कोठडी मागितली आहे. त्यानुसार पनवेल न्यायालयाने पोलिस कोठडीत वाढ केली आहे. 

महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणात नवी मुंबई पोलिस पथकाने पोलिस निरीक्षक अभय कुरुदकर याना अटक केली होती अभय यांच्या इतके नंतर पोलीस पथकांनी तपास दरम्यान मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील याला अटक केली होती. त्या दरम्यान दोन्ही आरोपीना १५ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली होती. १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज पुन्हा दोन्ही आरोपींना आज पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले होते.