Fri, Sep 20, 2019 04:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्‍विनी बिंद्रे प्रकरणी अभय कुरूंदकर निलंबित

अश्‍विनी बिंद्रे प्रकरणी अभय कुरूंदकर निलंबित

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 10:34AM

बुकमार्क करा

नवी मुंबई : प्रतिनिधी

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेला ठाणे ग्रामीण विशेष शाखेचा पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकरला शनिवारी निलंबित करण्यात आले.

सोशल मीडियावर अश्‍विनी बिंद्रे यांना कुरूंदकर मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तातडीने सूत्रे हलवत कुरूंदकर याला 7 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. अटकेच्या कारवाईनंतर तब्बल 15 दिवसांनी त्याला निलंबित करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.

नवी मुंबई येथील कळंबोली रोडपाली येथून महिला एपीआय अश्‍विनी जयकुमार बिंद्रे बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचे शेवटचे लोकेशन मीरा रोड येथे सापडले होते. अभय कुरूंदकर हा या काळात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून याच ठिकाणी काम करीत होता. बेपत्ता झाल्यानंतरही अश्‍विनी बिंद्रे यांना कुरूंदकर याने सतत फोन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अश्‍विनी यांनी अभय याच्याकडे लग्‍नासाठी तगादा लावल्याने कुरूंदकर याने त्यांचा काटा काढून मृतदेह खाडीत फेकल्याचा संशय आहे.

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex