Mon, Apr 22, 2019 15:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘या’ पोलिस कवीला तुम्हीही दाद द्याल.. (Video)

‘या’ पोलिस कवीला तुम्हीही दाद द्याल.. (Video)

Published On: Mar 02 2018 11:39AM | Last Updated: Mar 02 2018 11:39AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील

ऑन ड्युटी २४ तास असलेल्या पोलिसांना सततच्या दैनंदिन कामामुळे आपले कला गुण दाखवणे शक्य होत नाही. पण मग एखाद्यावेळी त्यांच्यातला कलाकार जागा होतोच. असाच एक पोलिस कवी मराठी भाषादिनी जागा झाला. जळगावमध्ये २७ फेब्रुवारी रोजी  मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जळगाव पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांना कविता म्हणण्याचा मोह आवरता आला नाही. कराळे यांनी भाषा दिनाच्या कार्यक्रमात दोन कविता सादर केल्या.

यापुर्वी देखील राज्य पोलीस दलात कवी, साहित्यिक आणि गायक असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबई येथे राष्ट्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी ३९ पोलीस आयुक्ततालयातील आणि अधिक्षक कार्यालयातील पोलिस क्रिडापटूंनी सहभाग घेतला होता.  त्याच्या समारोप समारंभाच्या वेळी पोलिसांनी अनेक गाणी सादर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालकांची दाद मिळवली होती.