Tue, Mar 19, 2019 15:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलीस निरीक्षकाच्या मुलाची हत्या

पोलीस निरीक्षकाच्या मुलाची हत्या

Published On: May 10 2018 1:59AM | Last Updated: May 10 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या नरेंद्र शिंदे यांच्या 20 वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह आरेच्या जंगलात बुधवारी सकाळी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याची हत्या करुन मृतदेह फेकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याने याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन आरे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात शिंदे कुटुंबिय राहात आहेत. शिंदे यांचा मुलगा अर्थव हा रविवारी रात्री आरेमधील रॉयल पाम परिसरात मित्रांसोबत पार्टीसाठी गेला होता. तो परतलाच नाही. त्याच्या मित्र-मैत्रिणींसह नातेवाईक, तसेच परिसरात शोध घेऊनही तो न सापडल्याने कुटुंबियांनी अर्थव हरविल्याची तक्रार पोलिसांत दिली. अर्थवचा शोध सुरु असताना मंगळवारी सायंकाळी उशिरा एका स्थानिकाने आरे टेकडीच्या जंगलात एक तरुण बेशुद्धावस्थेत पडला असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. 

याची वर्दी मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची नोंद करुन तपास करत असताना हा मृतदेह अर्थवचा असल्याचे उघड झाले. कुटुंबियानीसुद्धा अर्थवचा मृतदेह ओळखला. अर्थवच्या मानेवर काही खुणा होत्या. तोंडातून रक्त येत होते. तसेच प्राथमिक शवविच्छेदनात त्याची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. 

Tags : Mumbai, mumbai news, Police Inspector, son, murdered,