Sun, May 19, 2019 12:12
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ह्रतिकच्या कॉल डिटेल्सप्रकरणी कंगनाची चौकशी

ह्रतिकच्या कॉल डिटेल्सप्रकरणी कंगनाची चौकशी

Published On: Mar 21 2018 8:25AM | Last Updated: Mar 21 2018 9:13AM 

ठाणे  : पुढारी ऑनलाईन

मोबाईलमधील संभाषणाची चोरी करून (सीडीआर) त्याची विक्री केली जात असल्याचे प्रकरणात बॉलिवूडसह अनेक बड्या व्यावसिकांच्या नावाचा समावेश असल्याचे समोर येत आहे. राज्यातील सर्वच खासगी गुप्तहेर एजन्सींवर पोलीस नजर ठेवणार आहेत. या प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज नावे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बॉलीवूड क्विन कंगना राणावतसह जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा हिचे नाव देखील या प्रकरणात समोर आले आहे.       

गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात अनेक कलाकारांसह व्यावसायिकांचा सहभाग असून, पोलिस यासंदर्भात चौकशी करत आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिद्दीकीच्या मोबाईल विश्लेषणादरम्यान आयेशा यांनी एका सूत्राकडून अभिनेता साहिल खानच्या सीडीआरची पूर्तता केली असल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतने ह्रतिक रोशनाचा मोबाईल नबंर सिद्धीकीला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित मोबाईल ऑपरेटरच्या नोडल ऑफिसरकडून अधिक माहिती मिळवण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणात आयेशा यांना समन्स पाठवण्यात येणार आहे. नोडल ऑफिसरकडून  मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर कंगना रणावत अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Tag  : Police Crime Branch,  Summoned, Bollywood, Actress Kangna Ranaut,  Aaysa Shroff, Hrithik roshan