Mon, Mar 25, 2019 03:18
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दैव बलवत्‍तर म्‍हणून सावंत- देसाई बचावले 

दैव बलवत्‍तर म्‍हणून सावंत- देसाई बचावले 

Published On: Jul 28 2018 4:23PM | Last Updated: Jul 28 2018 4:48PMपोलादपूर : प्रतिनिधी 

पोलादपूर –महाबळेश्वर राज्यमार्गावर पोलादपूर हद्दीतील दाभिळटोक येथे सकाळी 10:45 वाजण्याच्या सुमारास खासगी बस दरीत कोसळून झालेल्‍या अपघातात ३३ जणांचा मृत्‍यू झाला. ही बस महाबळेश्वरकडे जात असताना धुक्यामुळे चालकाला पुढील रस्ता न दिसल्याने सदरची बस डाव्याबाजूला असलेल्या दरीत सुमारे 800 फुट खाली कोसळली. या अपघातात नशीब बलवत्‍तर म्‍हणुन प्रकाश सावंत-देसाई बचावले. या अपघाताची माहिती प्रथम प्रकाश सावंत-देसाई यांनीच स्‍थानिकांना दिली. 

यावेळी बचावलेल्‍या सावंत-देसाई यांनी सांगितलेल्‍या माहितीनुसार अपघाताच्या आधी त्‍यांनी प्रसंगावधान राखत बसमधुन उडी मारल्‍याने ते बचावले. यावेळी त्‍यांनी ताबडतोब या अपघाताची माहिती स्‍थानिक नागरिकांना दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी आज सकाळी 9 च्या सुमारास महाबळेश्वर ला पर्यटना करिता निघाले होते . मात्र पोलादपूर घाटात  बस सुमारे 10.45  च्या दरम्यान  800 फूट दरीत कोसली आहे या बस मध्ये हेमंत सुर्वे ,पंकज कदम , राजेश  बंडबे , सुनील कदम , किशोर चौगले , सुयश बाळ , सचिन झगडे , संदीप सुवरे ,  एस .आर .शिंदे , श्रीकांत तांबे , राजेश सावंत ,प्रकाश सावंतदेसाई , संदीप झगडे यांचा समावेश आहे , या मध्ये काही प्राध्यापक , लिपिक ,  सहाय्यक प्राध्यापक, यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात ही खासगी बस 800 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह 33 जण होते, त्या पैकी ३२ जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते.

या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचारी आणि 2 चालक-वाहक असे एकूण 40 जण असल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र स्थानिक शिवसेना आमदार यांनी या बसमध्ये 33 जण होते, त्यापैकी 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिाली.

महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. दरवर्षी भाताची लावणी झाल्यानंतर कृषी विद्यापीठातील कर्मचारी पिकनिकला जातात. त्याप्रमाणे हे कर्मचारी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास दापोलीहून महाळेश्वरला जाण्यासाठी निघाले. परंतु साडेदहा वाजता कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळल्याचा फोन आल्याचे कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक संजय भावे यांना आला सदरच्या बस मध्ये 38 कर्मचारी होते, त्यात महिला कर्मचारी नव्हत्या,अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, बस अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा आणि महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी पोलादपूरला रवाना झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. बचावकार्य सुरु असलं तरी पोलादपूर घाटातील वाहतूक सध्या तरी सुरळीत आहे.

या अपघातस्‍थळी 10 रुग्ण वाहिका ठेवण्यात आल्या असून, महाड पोलादपूरसह महाबळेश्वरचे ट्रेकर्स खोल दरीत उतरून मृत्यू झालेल्या प्रवाशांना दरीतुन वर काढण्याचे काम करीत आहेत. घाटात धुके आणि पावसाच्या सरींमुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत येत आहेत.

आमदार भरत गोगावले यांची माहिती

दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक प्रशासनाकडून तातडीने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली. पावसामुळे काही काळ रेस्क्यू ऑपरेशनमध्ये व्यत्यय आला, मात्र पाऊस थांबल्याने वेगाने बचावकार्य सुरु आहे. अॅम्ब्युलन्स, पोलीस प्रशासन आणि स्थानिकांच्या सहकार्यातुन सर्वजण मदतकार्य करत आहेत, अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.

या अपघातस्‍थळी सह्याद्री ट्रेकर्स, सातारा ट्रेकर्स,महाबळेस्वर ट्रेकर्स यासह 2 टीम मिळुन एकूण 5 ट्रेकर्सही मदत कार्यात सहयोग करत आहेत.