Thu, Nov 22, 2018 16:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नऊवारी साडीत 13 हजार फुटांवरून घेतली उडी

नऊवारी साडीत 13 हजार फुटांवरून घेतली उडी

Published On: Feb 15 2018 2:14AM | Last Updated: Feb 15 2018 1:57AMठाणे : अमोल कदम

स्काय डायव्हिंग या साहसी खेळात अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम करणार्‍या पुण्याच्या पद्मश्री शीतल महाजन यांनी नुकतेच मराठीमोळी नऊवारी साडी परिधान करून थायलंडमध्ये तेरा हजार फुटावरून उत्तुंग भरारी घेतली. मराठी संस्कृतीच्या जतनासाठी महाजन यांनी विदेशी मुलुखात नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करून मराठी बाणा जपला. 

थायलंड या देशातील स्काय डायव्हिंग सेंटर येथे तेरा हजार फुटावरून त्या 11 फेब्रुवारीला उडी मारणार होत्या. परंतु ढगाळ वातावरणामुळे त्यांना दुसर्‍या दिवशी म्हणजे 12 जानेवारीला सकाळी हा विक्रम करावा लागला. 

आकाशातून उडी घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यात प्रामुख्याने विशिष्ट पेहरावाची गरज असते. असे असताना  शीतल महाजन यांनी चक्क मराठीमोठी नऊवारी साडी नेसून अनोखा विक्रम आपल्या नावे नोंदविला. 

पुण्यातील कोथरूड येथे राहणार्‍या शीतल महाजन यांनी 2018 च्या सुरूवातीलाच नवे रेकॉर्ड केले. यापूर्वी त्यांनी 30 हजार फुटावरून स्काय डायव्हिंग करून जागतिक विक्रम नोंदविली होता. त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते.  नऊवारी साडी नेसून घेतलेल्या उडीबाबत त्यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या नऊवारी साडी ही महाराष्ट्राची शान आहे.